बांदा :उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग तर्फे सीमा तपासणी नाका इन्सुलि येथे 'वाहन चालक दिन' साजरा करण्यात आला, यावेळी वाहतूक नियम पाळा, अपघात टाळा असा संदेश परिवहन अधिकाऱ्यांनी वाहन चालकांना दिला.
वाहन चालक दीन अनेक चालकांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात बोलताना वाहन चालकांना मोटार वाहन कायदा व रस्त्यावर वाहन चालवताना रस्ता सुरक्षा नियम आणि त्याचे उल्लंघन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच वाहन चालकांना गुलाबपुष्प देऊन त्यांना चालक दिनानिमित्त शुभेच्छां देण्यात आल्या. कार्यक्रमास मोटर वाहन निरीक्षक जितेंद्र पाटील, सहायक मोटर वाहन निरीक्षक अमित नायकवडी, सिंधुदुर्ग लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी घोगळे, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कमिटीचे सचिव मनोज वालावलकर, अनिल मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक अनिल पावसकर, वरिष्ठ लिपिक गणेश कोळी, शिपाई गणेश जाधव तसेच वाहनचालक व ग्रामस्थ इन्सुली बांदा उपस्थित होते.