
सावंतवाडी : राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस सावंतवाडी येथे शिवसैनिकांना सामाजिक उपक्रम राबवित मोठ्या उत्साहात साजरा केला. रूग्णांना फळवाटप तसेच विविध सामाजिक उपक्रम तालुक्यात राबविण्यात आले. अटल प्रतिष्ठान संचलित शिशुवाटिकेत चिमुकल्यांसह शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी युवा सेना तालुका प्रमुख प्रतिक बांदेकर, सावंत, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख साईश वाडकर, तालुका प्रमुख रोहीत पोकळे आदी उपस्थित होते.