
दोडामार्ग : घाट माथ्यावर तळकट कुंभवडे मार्गे कत्तलीसाठी अवैद्य रित्या गुरे वाहतूक करणाऱ्या चंदगड येथील मयूर गुंडू नाईक ( 24 ),व अजय तुकाराम नाईक (24) दोघाना तळकट येथील युवकांनी थांबवून दोडमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दोडामार्ग पोलिसांनी या दोघांवर कत्तलीसाठी गुरे नेत असल्याच्या आरोपात ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती आशिकी तळकट कुंभवडे मार्गे एक चारचाकी बोलेरो पीकप गाडी घाट माथ्यावर एकदिवस आड करू जात असल्याचे तळकट येथील युवकांना दिदर्शनास आले. कुंभवडे मार्गे घाट माथ्यावर जाणारी ही कर्नाटक पासिंग गाडी काहीतरी गोलमाल करीत आहे असा अंदाज व्यक्त करीत काल मंगळवारी रात्री तळकट येथील युवकांनी ती गाडी आली असता थांबवली व विचारपूस केली. त्यावेळी चालक मयूर नाईक व त्याचा साथीदार यांनी बनवा करत ती गुरे शेतीच्या कामासाठी किंवा पाळण्यासाठी नेत असल्याचे सांगितले, प्रत्येक वेळी त्यांचे उत्तर वेगळे असल्याने त्या युवकांनी दोडामार्ग पोलिसांना
फोन केला व घटना स्थळी बोलावले. त्यावेळी घटना स्थळी आलेल्या पोलीसांनी गाडीची झाडा झडती घेतली व त्यावेळी त्यांना गाडीत तीन गुरे असल्याचे निदर्शनास आले. सर्व विचार पूस केल्या नंतर त्या दोन्ही आरोपीना दोडामार्ग पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. यावेळी तळकट येथील सरपंच सुरेंद्र सावंत, प्रज्योत देसाई, प्रकाश देसाई, झोळंबे उपसरपंच गाडगीळ, अवधूत वेटे, चंद्रहास राऊळ, गौरेश गवस, अनंत गवस, रजत देसाई, बाबल गवस, ऋषीं राऊळ, बंड्या राऊळ, नारायण राऊत, काका राणे, लवू वेटे, आदी ग्रामस्थ उपस्तित होते.
गुरांच्या अवैद्य वाहतुकीवर आळा घाला
दोडामार्ग तालुक्यातून तळकट कुंभवडे किंवा विजघर व चोरला घाट मार्गे अवैद्य रित्या दारूच्या वाहतुकी बरोबर कत्तलिसाठी गुरे वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. अवैध रित्या ही वाहतूक दिवसा रात्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आता बोलले जातं आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या अवैद्य दारू किंवा गुरे वाहतुकीवर तात्काळ आळा घालणे गरजेचे आहे. अवैद्य धंद्यासाठी कायमच चर्चेत असणाऱ्या दोडामार्ग तालुक्याचे अवैद्य धंद्याचे जाळे सोडवा, अस आता बोलल जात आहे. मग या अवैद्य धंद्यांवर दोडामार्ग पोलीस ॲक्शन घेणार काय? हे पाहण तितकच पोलिसांन समोर आवाहन बनल आहे.