कॅथॉलिक पतसंस्थेचा २९ वा वर्धापन दिन उत्साहात | २९ वर्षाची विश्वासार्ह, ग्राहकाभिमुख वाटचाल

Edited by: विनायक गावस
Published on: October 06, 2023 17:37 PM
views 113  views

सावंतवाडी : कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेचा २९ वा वर्धापन दिन शुक्रवारी संस्थेच्या प्रधान कार्यालयात प्रमुख पाहुणे रेव्ह. फा. मिलेट डिसोजा तसेच सर्व संचालक मंडळ, माजी संचालक, कर्मचारी व ग्राहकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. सुरूवातीला फा. मिलेट डिसोजा यांनी प्रार्थना केली व संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्त साधून संविता आश्रम, कुडाळ येथे संस्थेमार्फत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व आर्थिक मदत देण्यात आली.

संस्थेला सतत प्रगतीपथावर ठेवण्यास संस्थेचे सर्व निष्ठवान सभासद, ग्राहकांचे अध्यक्ष पि. एफ डॉन्टस यांनी मनःपूर्वक आभार मानले. तसेच २९ साव्या वर्धापनदिन विशेष ऑफर म्हणून दसरा व दिवाळी सणा निम्मीत “कॅथॉलिक उत्सव ठेव योजना” मुदत: १८ महिने व्याजदर : 9.50% सुरू करत असून आपली गुंतवणूक करून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान अध्यक्षांनी केले आहे.