
संपुर्ण कोकण विभागातून जिल्ह्यातील हा मान मिळवणारी ही एकमेव संस्था आहे. राज्यस्तरावर वेगवेगळ्या पतसंस्थाकडून मागविण्यात आलेल्या माहितीच्या आधारे, तज्ञ निवड समितीने केलेल्या मुल्यांकनानुसार संस्थेची पुरस्करासाठी निवड करण्यात आली आहे. सहकार क्षेत्रात कॅथॉलिक पतसंस्था नावाजलेली असून संस्थेच्या गुणवत्तापूर्ण कामामुळे संस्थेला आजवर ६ वेळा हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सलग सहावेळा बँको पुरस्कार मिळवणारी सिंधुदुर्ग जिल्हातील एकमेव कॅथॉलिक पतसंस्था आहे. आपल्या सुलभ कारभारामुळे संस्थेचे आपल्या ग्राहकांशी विश्वासाचे नाते जोडले गेले आहे व पुरस्कार ही संस्थेच्या चांगल्या कामाची पोचपावती असल्याचं संस्थेच्या अध्यक्षा आनमारी जॉन डिसोजा यांनी सांगितलं.