
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथे मोतिबिंदु नेत्रशस्त्रक्रिया सेवा सुरु झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथील नेत्र रुग्णलयाच्या शस्त्रक्रीया गृहामधील नवीन यंत्रसामुग्रीचे ओ.टी स्वाब नमुने मायक्रोबायोलॉजी तपासणीकरीता प्रयोगशाळेकडे ३ वेळा पाठविण्यात आलेले होते. सदरचे ओ.टी स्वाब नमुने तपासणीअंती निगेटीव्ही आले.
दिनांक २२ जानेवारी २०२५ पासून मोतिबिंदु नेत्र शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झालेली आहे. ३ दिवसात एकूण १७ मोतिबिंदु नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीरित्या झालेल्या आहेत. या पुढे पुर्वीप्रमाणेच आठवड्यातून ४ दिवस पात्र रुग्णांच्या मोतिबिंदु नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येतील अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.