
बांदा : बांदा येथील काणेकर कॅश्यू इंडस्ट्रीचे मालक भालचंद्र नरसिंह काणेकर (वय 70) यांचे शनिवारी संध्याकाळी गोवा मेडिकल कॉलेज येथे उपचारा दरम्यान निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सर्वेश काणेकर असा परिवार आहे तर बांदा येथील काजू व्यावसायिक रवींद्र काणेकर, उमेश काणेकर, भाजपचे जेष्ठ पदाधिकारी शामकांत काणेकर, उद्योजक श्रीकृष्ण काणेकर, यांचे ते भाऊ होत. अंत्यविधी बांदा येथील स्मशानभूमीत रविवारी (आज) सकाळी दहा वाजता करण्यात आले.