फोंडाघाट चेक पोस्टवर कारमध्ये सापडली 38 लाखांची रोकड

सिंधुदुर्गात खळबळ
Edited by: उमेश बुचडे
Published on: June 20, 2024 03:34 AM
views 699  views

कणकवली  :फोंडाघाट चेक पोस्ट वर  सावंतवाडी हून कोल्हापूर च्या दिशेने जात असलेली कार 19 जून रोजी रात्री 8:30 सुमारास चेक पोस्टवर आली असता तेथे कार्यरत असलेले नितीन बनसोडे व सागर देवार्डेकर यांनी तपासली या कार मध्ये सुमारे 38 लाख 67 हजार रोख रक्कम आढळून आली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

कणकवली पोलीस निरीक्षक तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कार न एम एच 09 एफ व्ही 4078 मारुती स्विफ्ट कार होती. यावेळी माहिती मिळताच  पी एस आय हडळ आणि पी एस आय शेगडे घटनास्थळी दाखल झाले. कार मधील दोन्ही संशयिताना समर्पक उत्तरे देता येत नसल्याने महसूल च्या अधिकार्यांनाही पाचारण करण्यात आले आहे.


नितीन बनसोडे यांनी खारेपाटण चेक पोस्ट असताना पकडलेली बिनापरवाना बंदूक आणि आता फोंडाघाट चेक पोस्ट वरील सुमारे 38 लाख 67 हजारची रोकड यामुळे या कर्तव्यनिष्ठ कार्यतत्पर पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांचे कार्य कौतुक होत आहे.