कॅनमधून पेट्रोल घेऊन जाताय..?

मग हि बातमी वाचाच
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 28, 2023 17:42 PM
views 2181  views

कुडाळ : ४ डिसेंबरला नौसेना दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व  इतर VIP  व्यक्तींच्या सुरक्षेच्या कारणास्तव जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालक व मालक यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.  या नोटीस मध्ये पेट्रोल पंप धारकांनी गॅलन किंवा कॅन यामध्ये खुले पेट्रोल व डिझेल विक्री करू नये असे आवाहन करण्यात आलं आहे.

अशी  विक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे या नोटीशीमध्ये म्हटले आहे.  तर याला पोलीस प्रशासनाकडूनही दुजोरा देण्यात आला असून सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोल विक्री करणाऱ्या पेट्रोल पंप चालक व मालकांना नोटीसा बजावण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.