
देवगड : कुणकेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी कुणकेश्वर यांच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त कुणकेश्वर हायस्कुल येथे करिअर मार्गदर्शन उपक्रम इ.७ ते १२ वी विद्यार्थी व पालकांकरिता शनिवारी सकाळी ८.३० ते १२ या वेळात पार पडला. या वेळी सुमारे २०० विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमात खानविलकर कोचिंग अकॅडमी फोंडा ता.कणकवली चे प्रमुख मार्गदर्शक प्रदीप खानविलकर यांनी उपयुक्त मार्गदर्शन करून सहकारी क्षेत्रातील ग्रामीण भागातील संस्थेमार्फत असे उपक्रम राबविले जातात ही बाब अभिमानास्पद व कौतुकास्पद असल्याचे आवर्जून सांगितले. या प्रसंगी कुणकेश्वर सोसायटीचे चेअरम निलेश पेडणेकर, व्हॉइस चेअरमन भाऊ मुंबरकर, अमृतमहोत्सव कमिटी अध्यक्ष तुकाराम तेली , कुणकेश्वर शिक्षण विकास मंडळ अध्यक्ष चंद्रकांत घाडी,मुख्याध्यापक श्री यादव, सोसायटी संचालक नागेश आचरेकर, शंकर नाणेरकर, संदीप जोईल, शांताराम चव्हाण, सत्यवान धुरी, अन्य पालक उपस्थित होते.