
दोडामार्ग : भेडशी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी डॉक्टर संजय खडपकर यांचे करियर विषयक मार्गदर्शन संपन्न झाले. लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयातर्फे दोडामार्ग तालुका, बांदा, चंदगड या विविध हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये हळबे कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुभाष सावंत यांच्या प्रेरणेने करिअर विषयक मार्गदर्शन उपक्रम राबविले जातात याचाच एक भाग म्हणून भेडशि येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी डॉक्टर संजय खडपकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी बारावी नंतर पुढे काय या विषयावर व्याख्यान दिले यामध्ये विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले कॉमर्स शाखे मधून अकाउंटंट किंवा सीए तसेच एमबीए,
शासनाच्या विविध सेवा यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी, केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी, राष्ट्रीयकृत बँकांमधील करिअरच्या संधी ,पोलीस भरती अशा विविध विषयावर सखोल मार्गदर्शन केले. आजचा तरुण हा सोशल मीडियात गुरफटत चाललं असून विज्ञानाची प्रगती विकासासाठी करावयाची आहे अधोगतीसाठी करावयाची नाही असे त्यांनी आवर्जून सांगितले. आपल्या परिस्थितीचा बाहु करत बसू नका परिस्थितीवर मात करा जी यशस्वी माणसं झालेली आहेत ती कठीण परिस्थितीतून निर्माण झालेली आहे वेळेचं भान ठेवा. ग्रामीण भागातला विद्यार्थी सुद्धा शहरी भागातल्या विद्यार्थ्याप्रमाणे यशस्वी होईल शासनाच्या विविध सेवांमध्ये दोडामार्ग तालुक्यातील तरुण चमकतील राज्याचं देशाचं नेतृत्व करतील हॉटेल मॅनेजमेंटच्या प्राध्यापिका दर्शनी कोटकर हिने महाराष्ट्राच्या सीमेवरच मोपा विमानतळ तसेच गोव्यातील पर्यटन वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट ची पदवी किती महत्त्वाची आहे यावर चर्चा केली.
महाविद्यालयाचे ग्रंथपाल रामकिसन मोरे यांनी महाविद्यालयात चाललेल्या विविध ऍक्टिव्हिटी बाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार नाईक यांनी आपले विद्यार्थी विविध पातळीवर चमकले पाहिजे असे त्यांनी मत मांडले.
यावेळी व्यासपीठावर न्यू इंग्लिश स्कूल भेडशी प्राचार्य नंदकुमार नाईक हळवे कॉलेजचे ग्रंथपाल रामकिसन मोरे, हळवे कॉलेजच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे विभाग प्रमुख प्रा. रोहन बागकर, प्रा. दर्शनी कोटकर ,वेदांत फाउंडेशनच्या प्रा. सेफाली गवस तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भेडशि हायस्कूलचे प्रा.अमित कर्पे तर आभार श्रेया गवस यांनी मानले.