
सिंधुदुर्गनगरी : पावसाच्या कालावधीत जीवित व वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी.त्याचबरोबर पदवीधर मतदार संघाची आचारसंहिता आणि आगामी बकरी ईद या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जनतेने सहकार्य करावे असे आवाहन सौरभकुमार अग्रवाल यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समिती बैठकीत केले.
सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे पोलीस अधीक्षक सौराभकुमार अग्रवाल , यांच्या उपस्थित पोलीस पाटील, शांतता कमिटी, दक्षता समिती, प्रतिष्ठीत नागरीक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकी दरम्यान आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पावसाळ्यात घ्यावयाची काळजी, आरोग्याची दक्षता या बाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. पावसाळयामध्ये विद्युत लाईन तुटून, दरड कोसळुन अगर पुरपरिस्थिती निर्माण होऊन जिवीत अगर वित्तहाणी होऊ नये याकरीता किंवा अशाप्रकारची माहिती मिळाल्यास तात्काळ यंत्रणेस कळवावी. याकरीता दामीनी ॲप, सचेत ॲप ची जागरुकता निर्माण होण्याकरीता माहिती देण्यात आली. तसेच आगामी कोकण पदवीधर निवडणूक अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे पालन करणे, बकरी ईद सणाच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घ्यायची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
1 जुलै 2024 पासुन लागु होणारे नवीन कायदे भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 व भारतीय साक्ष्य अधिनियम 2023 बाबत ओळख व नवीन कायद्यांमधील तरतुदीबाबत माहिती देण्यात आली. यावेळी बैठकी करीता पोमलिस निरिक्षक सचिन हुंदळेकर, सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनीष कोल्हटकर,शांतता कमिटी सदस्य, दक्षता समिती सदस्य, हॉटेल व्यावसायिक, प्रतिष्ठीत नागरिक आदी उपस्थित होते.