
बांदा : मुंबई - गोवा महामार्गावर बांदा बसस्थानक नजीक असलेल्या दुसऱ्या पुलावरून भरधाव वेगात असलेली कार ओहोळातील पाण्यात कोसळून अपघातग्रस्त झाली. हा अपघात रात्री एक वाजताच्या सुमारास झाला. बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलंय. या कारमध्ये 6 जण अडकले होते. मात्र यातून ते सहाही व्यक्ती सुखरूप बाहेर पडले.
आज सकाळी ही घटना येथील नजीकच असलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रशांत पांगम यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याची माहिती बांदा पोलीस व स्थानिक ग्रामस्थांना दिली. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कार (एमएच ०७ एजी ०००४) रात्री ओहोळात कोसळली. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने व मुसळधार पाऊस सुरु असल्याने अपघात झाल्याचे लक्षात आले नाही.