
कणकवली : कणकवली तरंदळे फाटा येथेल उड्डाणपुलावर हुंबरठ वरून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या वॅगनार कारचा बुधवारी दुपारी 1.30 च्या सुमारास अपघात झाला. यामध्ये कारचे पुढील चाक तुटून पडल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले. हा अपघात नेमका कसा झाला हे माहीत नसले तरी सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गाडीमध्ये असणाऱ्या एकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
यावेळी आमदार नितेश राणे यांचा ताफा कणकवलीच्या दिशेने येत असताना अपघात झाल्याचे दिसतात नितेश राणे यांनी गाडीतून उतरून जखमींची विचारपूस केली. यावरून आ नितेश राणे याना आपल्या जनतेची काळजी असल्याचे दिसून आले.