
सावंतवाडी : कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेने कॅप्टन निकिता महादेव वेलणकर (रा. शिरोडा ता. वेंगुर्ला) हीच्या शिक्षणासाठी कर्ज देऊन हातभार लावला होता. तीनं आपले शिक्षण पुरे करत इंडिगो एअरलाईनमध्ये एअर पायलेट म्हणून ती काम करत आहे. तीने आज संस्थेच्या शाखा शिरोडा येथे संचालक मंडळाची भेट घेऊन केलेल्या सहकार्याबद्दल संस्थेचे आभार मानले. संस्थेच्या संचालक मंडाळातर्फे तीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कॅथॉलिक पतसंस्थेच्या माध्यमातून आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एका मुलीला एअर पायलेट होण्यासाठी हातभार लाऊ शकलो व आज तीने मिळविलेल्या यशाबद्दल आपल्या संस्थेला खुप अभिमान वाटत असल्याचे उद्गार संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आनमारी जॉन डिसोजा यांनी काढले. तीच्या पुढील वाटचालीस सर्व संचालक मंडळाने तीला सुभेच्छा दिल्या. कु. कॅप्टन निकीताच्या आई-वडिलांनी देखील आपल्याला गरजेच्यावेळी संस्थेने केलेल्या सहकार्याबद्दल संस्थेचे आभार मानले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष पिटर दिया, सेक्रेटरी मार्टीन आल्मेडा, संचालक जॉय डॉन्टस, व्हिक्टर पिंटो सरव्यवस्थापक जेम्स बॉर्जीस स्थानिक कमिटी सदस्य येरमु मेंतेरो, आबास मेनास शाखेचे सिनियर व्यवस्थापक आशिष परेश, गॅब्रियेल फर्नान्डीस व इतर कर्मचारी उपस्थित होते.