शिरोडा बायपास इथं चालत्या कँटरला लागली आग : गाडीचे मोठे नुकसान

Edited by: दिपेश परब
Published on: September 30, 2023 11:50 AM
views 261  views

वेंगुर्ले : आरोंदा येथुन शिरोडा मार्गे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कँटर ला शिरोडा बायपास येथे आला असता चालू गाडीला अचानक आग लागली. या आगीमध्ये कँटर पूर्णपणे जळून खाक झाला आहे. ही दुर्घटना मद्यरात्री २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या बाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात कळविण्यात आले आहे.

रेडी येथील अंकुश उर्फ प्रशांत नाईक यांनी आपल्या मालकीचा एम एच ०७ ए जे ३७२७ या क्रमांकाचा कँटर चार महिन्या पूर्वी नवीन आणला होता. काल शुक्रवारी गाडीत असलेले आरोंदा येथील सामान उतरून रात्री उशिरा प्रशांत नाईक गोव्याला जात होते. गाडी शिरोडा बायपास येथे आली असता गाडीतून खालून धूर येऊ लागला आणि बघता बघता चालत्या गाडीने पेट घेतला. घाबरलेल्या प्रशांत यांनी आपले मामा प्रमोद नाईक यांना फोन करून या दुर्घटनेची माहिती दिली. ते येई पर्यंत आगीने रौद्ररूप घेतले होते. आग विझविण्यासाठी साठी सर्वांकडून प्रयत्न झाले परंतु गाडी पूर्ण जळाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलीस आता पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.