कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन सिंधुदुर्गमध्ये दाखल

ग्रामीण रुग्णालय दोडामार्गात कर्करोग रुग्णांची तपासणी
Edited by: लवू परब
Published on: July 15, 2025 14:43 PM
views 220  views

दोडामार्ग : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत कॅन्सर तपासणी व जनजागृती मोहीम सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु केली आहे. कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन सिंधुदुर्गमध्ये दाखल झाली असून संशयित रुग्णाची तपासाणी केली जातं आहे. देवगड तालुक्यातून तपासणी सुरवात केली आहे. दिनांक 23 जुलै रोजी सदरची व्हॅन ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग येथे  येणार आहे. 

महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत कर्करोगाची तपासणी व जनजागृती मोहीम सुरू केली आहे. यात कॅन्सर तपासणी सुविधा असलेली सुसज्ज कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाऊन तेथील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.

या व्हॅनमध्ये तज्ञ डॉक्टर मार्फत सर्व सुविधा उपलब्ध आहेत. ही कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन दिनांक 22/07/2025 रोजी साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र व 23/07/2025 ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग येथे आणि 24/07/2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगांव येथे येणार आहे. तरी याचा सर्व रुग्णांनी लाभ घ्यावा. असे आवाहन ग्रामीण रुग्णालय दोडामार्गचे वैद्यकीय अधीक्षक डॉ श्री आकाश एडके  व तालुका आरोग्य अधिकारी डॉ जगदीश पाटील  यांनी केले आहे.