
मालवण : शिवसेना भाजपा महायुतीचे कुडाळ - मालवण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारासाठी महायुतीने प्रचारात मुसंडी मारली आहे. नवी दिशा अध्याय नवा...कुडाळ मालवणला बदल हवा, परिवर्त घडवूया...विकासपर्व उभारूया असे घोषवाक्य घेऊन महायुतीने प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.
शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार निलेश राणे स्वतः कुडाळ मालवण तालुक्यात ठाण मांडून आहेत. अनेक पक्षप्रवेश घेताना थेट मतदारापर्यंत पोहोचत आहेत. खासदार नारायण राणे गावभेट दौरे करत आहेत. महायुतीचे सर्व पक्ष कामाला लागले आहेत. ग्रामीण भागात भाजपा वाडी वस्तीपर्यंत प्रचार सुरु आहे. गाव पातळीवर बैठकांचा धडाका लावला आहे. शहरात घरोघर प्रचारावर भर देण्यात आला आहे.