
वेंगुर्ला : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा व गावात जनजागृती व्हावी यासाठी अणसुर ग्रामपंचायतच्या वतीने १९ सप्टेंबर रोजी अणसूर हायस्कुल, पूर्ण प्राथमिक शाळा व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने संपूर्ण गावातून प्रचार फेरी काढण्यात आली.
या प्रचार फेरीत शाळेतील मुले, बचत गट, ग्रामस्थ, महिला वर्ग, ग्रामपंचायत अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सीआरपी, आशासेविका, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या प्रचार फेरी दरम्यान गावात स्वच्छतेचा नारा देण्यात आला. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी आडवा पाणी जिरवा, स्वच्छ गाव समृद्ध गाव, हरित गाव सुंदर गाव, हर घर नळ, प्लास्टिकचा वापर टाळा, जीव सृष्टी वाचवा अशा अनेक घोषणा देऊन गावात जनजागृती करण्यात आली. यावेळी अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर यांच्या सहित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.










