
देवगड : देवगड तहसीलदार कार्यालय व आजूबाजूच्या सर्व परिसरात स्वच्छता ही सेवा”या उपक्रमाअंतर्गत,,२४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत देवगड तहसीलदार कार्यालय व परिसर स्वच्छ करण्यात आला. तहसीलदार आर जे पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उपक्रम राबविण्यात आला. या वेळी निवासी नायब तहसीलदार विवेक शेट व अन्य महसूल शाखा अववल कारकून वरिष्ठ सहाय्यक कर्मचारी सहभागी झाले होते .
या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण देवगड तहसीलदार कार्यालय इमारत, इमारती सभोवारचा परिसर भागातील वाढलेली चार, गवत,कचरा, रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, सर्व एकत्रीत करण्यात आल्या . राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यात दि.१५ सप्टेंबर ते दिनांक २ ऑक्टोबर २३ या कालावधीत स्वच्छता ही सेवा २०२३ उपक्रम राबविण्यात येत असतो. “स्वच्छता ही सेवा २०२३” ची संकल्पना “कचरा मुक्त भारत” ही आहे.यामध्ये दृष्यमान स्वच्छता व सफाई मित्र कल्याण यावरती लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यावर्षी स्वच्छतेचे उपक्रम राबविणे आवश्यक असून,यामध्ये स्वयंस्फुर्तीने श्रमदान करणे गरजेचे आहे. या अभियानात ग्रामीण भागातील बसस्थानके, पर्यटन स्थळे, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले आदी ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. तसेच सिंगल युज प्लास्टीक (SUP) वापर व दुष्परिणाम याबाबत गावांमध्ये जनजागृती करणे, शालेय स्तरावर स्वच्छता मोहिम यांचे आयोजन करणे, ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण, कचऱ्यातुन उत्पन्न घेणे, बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी भिंती चित्रे काढणे व कचरा वर्गीकरण पेटया ठेवणे यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. स्वच्छतेसाठी युवकांच्या कृतीला चालना देण्यासाठी युवकाच्या नेतृत्वाखाली सर्व गटाना एकत्रित करून स्वच्छतेचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
दिनांक २४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शासकिय कार्यालयात स्वच्छता हि सेवा अंतर्गत सर्व शासकिय कार्यालये व कार्यालय परिसर स्वच्छ करण्याबाबत जिल्हाधिकारी किशोर तावडे व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यालयाना या बाबत सूचना दिल्या होत्या.त्या नुसार नियोजन करण्यात आले.