
सावंतवाडी : 'ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग', 'गिरीजानाथ ग्रामसंघ, सांगेली' आणि 'युवा विकास प्रतिष्ठान, सांगेली' यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्मान आरोग्य मंदिर, सांगेली येथे हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १०८ लाभार्थ्यांनी हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी करून घेतली.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी घोडे, ग्रामसंघ सचिव सुमन सांगेलकर, संस्थेचे कार्याध्यक्ष महेश रेमूळकर, सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, कार्यकारिणी सदस्य दिनेश गावडे, ग्रामसंघाच्या अध्यक्षा आकांक्षा किनळोस्कर, माजी सरपंच रवीश केरकर आदी उपस्थित होते.दयानंद गवस यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. महिलांनी हिमोग्लोबिनची काळजी घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासल्यास वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी प्रत्येकाला आपला रक्तगट माहीत असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. अश्विनी घोडे यांनी आहाराबाबत मार्गदर्शन केले.
शिबिरामध्ये उल्का आजगावकर, सदिच्छा राणे आणि प्रीती सावंत या लॅब टेक्निशियन यांनी रक्त तपासणी केली. रक्तपेढी तांत्रिक अधिकारी मनीष यादव यांनी आवश्यक किट उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले.
यावेळी ग्रामसंघाच्या सदस्य सुनयना सांगेलकर, लिपिक गिरिजा राऊळ, युवा विकास प्रतिष्ठानचे पंढरी सावंत, पुंडलिक राऊळ, लक्ष्मण रेमुळकर, समीर सावंत, उमेश राऊळ, श्रेयस राऊळ, विठ्ठल पालव, गुरूप्रसाद राऊळ, वसंत रेमुळकर, यशवंत राऊळ, श्यामसुंदर राऊळ, चंद्रशेखर नाईक आणि बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. महेश रेमूळकर यांनी सूत्रसंचालन केले, तर आकांक्षा किनळोस्कर यांनी आभार मानले.