
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील नायशी गावात, शासन आपल्या दारी अभियान अंतर्गत चिपळूण तहसीलदार प्रवीण लोकरे साहेब याच्या मार्गदर्शनाखाली, महाराजस्व अभियान प्राधान्य योजनेअंतर्गत विविध दाखले ग्रामस्थांना मिळाव्यात या प्रमुख उद्देशाने नायशी ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी 20 जून रोजी शिबीर आयोजित करण्यात आले असून, या शासनाच्या उपक्रमाचा ग्रामस्थांनी फायदा घ्यावा असे आहवंन सरपंच संदिप घाग यांनी केले आहे.
या शिबीराला असुर्डे येथील महा ई सेवेचे संचालक शैलेश खापरे व तलाठी सजा कोकरे हे उपस्थित राहून लाभार्थी वर्गास सहकार्य करतील या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना व शालेय विद्यार्थीना शालेय प्रेवशसाठी लागणारे जातीची दाखले, उत्पन्न दाखले, अन्य विविध प्रकारचे दाखले मिळणार आहेत
शासन पातळीवरील दाखले एका ठिकाणी मिळाव्यात या करिता महा इ सेवा चालक संचालक यांच्या सहकार्याने नायशी ग्रामपचायत हे शिबीर शासन स्तरावर आयोजित करण्यात आले आहे या करिता शासन प्रतिनिधी तलाठी सजा कोकरे साक समुद्रे, नायशी ग्रामसेवक वाय बी सोनवणे, कृषी सह्ययक आकाश चव्हाण ,सामाजिक वनीकरण चे अर्जुन जाधव, उपस्थित राहणार आहेत
वृक्ष लागवड उपक्रम सामाजिक वनीकरण माध्यमातून खैर लागवडी साठी ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची आहे त्यांनी सातबारा अर्जुन जाधव याच्याकडे मागणी देण्यासाठी उपस्थित रहावे असे आहवान करण्यात येत आहे. खैर लागवड करताना 20 गुंठे क्षेत्रासाठी 500 रोपे लावता येणार असून सदर लागवड करताना दोन रोपांमधील अंतर 2 मी × 2 मी एवढं अंतर असणार आहे 1 एकर क्षेत्रासासाठी 1000 रोपे देण्यात येणार आहेत.
दरम्यान, याच दिवशी कृषी विभागाच्या माध्यमातून पीएम किसान योजना करीत ज्या लाभर्तीची , इ.के. वाय. सी.करायची बाकी आहे , त्याची, इ के वाय सी करण्यासाठी कृषी सहायक ,पोस्टमास्तर , डेटा ऑपरेटर उपस्थित राहणार असून तिन्ही उपक्रम वेगवेगळ्या दालनात राबण्यातयेणार असून ग्रामस्थानी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन सरपंच संदिप घाग यांनी केले आहे.