
सावंतवाडी : ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे दरवर्षी जिल्हा स्तरावर उपक्रमशील व्यक्तींना विविध क्षेत्रात समाजाभिमुख कार्य केल्याबद्दल मानाचा समजला जाणारा ज्ञानदीप पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यासाठी यावर्षी 2025 मंडळाकडून प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मंडळाच्या या उपक्रमात जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक संगीत, पत्रकारिता क्रीडा, साहित्यिक व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनी दोन फेब्रुवारी २०२५ पर्यंत स्वताच्या गेल्या पंधरा वर्षांतील माहितीचा प्रस्ताव चार फोटोंसह अध्यक्ष जावेद शेख, एफ् 49,साल ईवाडा सावंतवाडी, सिंधुदुर्ग तसेच निलेश पारकर (कणकवली) प्रा.नागेश कदम (मालवण)या पत्यावर पाठवावेत असे आवाहन वाय पी नाईक,एस आर मांगले, विनायक गांवस, विठ्ठल कदम भरत गावडे श्रद्धा सावंत, प्रदीप सावंत, वैभव केंकरे, प्रतिभा चव्हाण यांनी केले आहे. हे पुरस्कार सौ.रेश्मा राजन भाईडकर,आर व्ही नारकर,व्ही टी देवण यांनी पुरस्कृत केले आहेत. ज्ञानदीप पुरस्काराचे हे सलग एकोणीस वर्षे असून अधिक माहितीसाठी वाय पी नाईक (९४२०२०४१०५) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.