
सिंधुदुर्गनगरी : केंद्र शासन पुरस्कृत मॅनेज संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी व कृषी संलग्न पदविका, पदवीधर, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या नागरिकांसाठी कृषी उद्योग प्रशिक्षणाचे ओरोस येथील कृष्णा व्हॅली नोडल प्रशिक्षण शाखेत आयोजन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात कृषी व कृषी संलग्न विषयातील शैक्षणिक पात्रात प्राप्त असलेले ६० वर्षाखालील व्यक्ती सहभागी होऊ शकतात. हे मोफत निवासी प्रशिक्षण असणार आहे.
तसेच व्यवसाय सुरु करण्यासाठी १ लाख पासून १ कोटी रुपयापर्यंतच्या कर्जावर नाबार्डचे ३६ ते ४४ टक्के अनुदान मिळणार आहे. त्याच बरोबर या प्रशिक्षणानंतर राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध कृषी संबंधीत प्रशिक्षणामध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. तरी इच्छुकांनी आपले नाव नोंदवण्यासाठी ओरोस खरयेवाडी, जैतापकर कॉलनी येथील कृष्णा व्हॅली नोडल प्रशिक्षण शाखेत संपर्क साधावा. (संपर्क - ८५५२९५९७०४, ८३०८२००४३२) असे आवाहन नोडल अधिकारी गजानन चौगुले यांनी केले आहे.