
चिपळूण : शहरातील नामवंत बांधकाम व्यवसायिक प्रवीण पटेल यांचे चिरंजीव भावेश पटेल व शहरातील गजानन स्वा मिलचे मालक पुरुषोत्तम पटेल यांची कन्या केतना कुणाल पटेल यांनी कोल्हापूर येथे झालेल्या सीए परीक्षेत उत्तम यश मिळविले आहे.
या यशाबद्दल भावेश पटेल,केतना पटेल यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून चिपळूण तालुक्यात पटेल कुटुंबीयांनमध्ये चार्टर्ड अकाउंटंन होण्याचा बहुमान भावेश व केतना यांनी मिळविला आहे. चिपळूण शहरातील नामवंत बांधकाम व्यवसायिक कविता डेव्हलपर्सचे मालक प्रवीण पटेल यांचा भावेश चिरंजीव असून कावीळतळी येथील गजानन स्वाॅमिलचे मालक पुरुषोत्तम पटेल यांची सौ.केतना कुणाल पटेल ही सुन आहे. केतना विवाहानंतर पुणे येथे स्थायिक झाली असून तिचे पती कुणाल पटेल हे सुद्धा पुण्यामध्ये नामवंत सीए आहेत.चिपळूण शहरातील गद्रे इंग्लिश मिडीयम स्कूल येथे भावेश याचे दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण झाले तर केतना हीचे गुहागर तालुक्यातील तळी येथील एका शिक्षण संस्थेत शिक्षण झाले.या दोघांना वयाच्या २४ व्या वर्षी सीए होण्याचा बहुमान मिळाला आहे. शहरातील नामवंत सीए बापूसाहेब भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली भावेश याने सराव केला आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया कोल्हापूर येथे हे दोघे चार वर्ष शिक्षण घेत होते. २४ मे २०२४ रोजी झालेल्या सीए परीक्षेचा गुरुवार दि. ११ जुलै २४ रोजी निकाल लागला यात चांगली ग्रेड मिळवत या दोघांनी यश संपादन केले.