दोन दुचाकी जळून खाक

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: January 01, 2026 19:30 PM
views 154  views

कुडाळ : कुडाळ - वेंगुर्ले मार्गावरील कुडाळ हायस्कूल नजिक रस्त्यालगतच्या टाकाऊ साहित्याला सुमारास आग लागली. ही आग अधिक भडकल्याने परिसरातील व्यावसायिक व नागरीकांची तारांबळ उडाली. संबंधित यंत्रणांना याबाबत माहीती देण्यात आली. कुडाळ पोलीसांसह अग्निशमन बंबाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. तेथील झाडाखाली नजिकच्या गॅरेज मधील दोन नादुरुस्त दुचाकी उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. त्या आगीत जळून खाक झाल्या.

तेथील आंब्याच्या झाडाखाली असलेल्या टाकाऊ साहित्याला आग लावण्यात आली. मात्र तेथे वाहनांचे खराब टायर असल्याने आग अचानक भडकली. तेथे गॅरेज मधील दोन नादुरुस्त दुचाकी उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. त्याही आगीत जळून खाक झाल्या. धुराचे लोट निर्माण झाल्याने नजिकच्या दुकानदारांसह नागरीकांची एकच तारांबळ उडाली. याबाबतची माहीती मिळताच कुडाळ पोलीसांसह लोकप्रतिनिधी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसी आणि कुडाळ न.पं. चे अग्निशमन बंबही पाचारण करण्यात आले. बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.