दोडामार्गमध्ये ST सेवेचा बोजवारा | ठाकरे सेना आक्रमक

Edited by:
Published on: February 03, 2024 06:14 AM
views 84  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी सावंतवाडी ST आगार प्रमुख निलेश गावित व शेवाळे यांची भेट घेऊन दोडामार्ग डेपोतून वेळेत न सुटणाऱ्या बस व बंद करण्यात आलेल्या एस. टी. फेऱ्या पूर्वरत सुरू करण्याची मागणी केली आहे.

तालुक्यातील विर्डी, पिकुळे, मांगेली, पाळये, सोनावल ह्या एस टी बस बंद करण्यात आल्या आहेत. त्या त्वरित चालू करण्याबाबत, तसेच सावंतवाडी पाळये ही बस शौचालय,  बाथरूमची सोय नसल्याने पाळये गावातील गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली वस्तीची बस फेरी पाळये येथून मेढे ग्रामपंचायत येथे स्थलांतरित करण्यात आलीय. ती बस तात्पुरती सावंतवाडी पाळये व्हाया मेढे अशी करावी अशी विंनतीही यावेळी करण्यात आली. 

ही विंनती आगार प्रमुख यांनी मान्य केली असून, शुक्रवार पासून पाळये गावात सदर फेरी पुर्वरत सूरू करतो असे आश्वासन देण्यात आले आहे. तर बंद करण्यात आलेल्या अन्य बस फेऱ्या संदर्भात येत्या आठ दिवसात शिवसेना पदाधिकारी व एस.टी. चे अधिकारी यांची संयुक्त बैठक  लावून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले आहे. या वेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, उपतालुका संघटक संदेश वरक, महिला तालुका प्रमुख श्रेयाली गवस, सुनील गवस, दीपक जाधव, बाबा खतीब व शिवसैनिक उपस्थित होते.