बंटी पुरोहित यांच्या उपक्रमाच संजू परब यांच्याकडून कौतुक...!

Edited by: विनायक गावस
Published on: August 19, 2023 17:11 PM
views 195  views

सावंतवाडी : भाजप जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस बंटी पुरोहीत यांच्या माध्यमातून सावंतवाडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रामेश्वर प्लाझा येथील 'टायटन ऑप्टीकल हब' येथील या शिबीराचा लाभ अनेकांनी घेतला.

यावेळी डोळे तपासणी करणार्‍या रुग्णांना कमीत कमी दरात चष्मे उपलब्ध करुन देण्यात आले. माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी या शिबिरास भेट देत बंटी पुरोहित यांच्या उपक्रमाच कौतुक केलं. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.