बंटी पुरोहितांनी स्थानिक गोष्टींत हस्तक्षेप करू नये : गौरेश कामत

Edited by: विनायक गावस
Published on: January 14, 2024 14:13 PM
views 684  views

सावंतवाडी : बंटी पुरोहित यांनी शहरातील स्थानिक गोष्टींत हस्तक्षेप करू नये. शहरातील  स्थानिक व्यवसायात लक्ष घालू नये. नगरपरिषद प्रशासन त्यासाठी समर्थ आहे असं मत गौरेश कामत यांनी व्यक्त केलं. सावंतवाडी शहरात गवळी तिठा व बस स्थानक परिसरात मासे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी बंटी पुरोहित यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती. यानंतर बंटी पुरोहित सोशल मिडियावर प्रचंड ट्रोल होताना दिसत असतानाच गौरेश कामत यांसह संकल्प धारगळकर, आदित्य आरेकर आदी सावंतवाडीकरांनी बंटी पुरोहित यांना याबद्दलच आवाहन केलं. तर मुंबईची परप्रांतीयांनी अवस्था केली तशी सावंतवाडीमध्ये होऊ देणार नाही असही ते म्हणाले.