
वेंगुर्ला : शिरोडा परबवाडा येथील हौशी बॉईज मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या हेवी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील सामनावीर चषक खास आकर्षण ठरतोय. शिरोडा येथील ग्रामपंचायत सदस्य तथा काँग्रेस युवक अध्यक्ष प्रथमेश उर्फ बंड्या परब यांच्या प्रयत्नातून सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हे परितोषिक लावण्यात आले आहे.