
वैभववाडी : बंड्या मांजरेकर मित्र मंडळ यांच्यावतीने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यतीच शनिवारी 15 फेब्रु.नाधवडे येथील महादेव मंदिरासमोरील मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील नामवंत बैलगाड्या या शर्यतीत उतरणार आहेत.
दरवर्षी प्रमाणे यंदाही नाधवडे येथे बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, तुळशीदास रावराणे, दिलीप रावराणे, प्रमोद रावराणे, सुधीर नकाशे, हनुमंत नारकर, दिगंबर इस्वलकर, लिना पांचाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा दोन गटांत होणार आहे.
राज्यसतरीय स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ३५हजार, द्वितीय २५हजार, तृतीय १५हजार, चतुर्थ १२हजार, उत्तेजनार्थ १० हजार, तर जिल्हासतरीय स्पर्धेसाठी प्रथम २०हजार, द्वितीय १७ हजार, तृतीय १२हजार, चतुर्थ ८हजार, राज्यसतरीय गावठी जोडी प्रथम ७हजार, द्वितीय ५ हजार, तृतीय ३हजार, उत्तेजनार्थ २हजार पाचशे अशी बक्षिसे असणार आहेत. बैलगाडा प्रेमींनी या स्पर्धेचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन बंड्या मांजरेकर यांनी केले आहे.