
कुडाळ : राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने जिजामाता चौक येथे आयोजित बैलगाडी सजावट स्पर्धेत सतिश आळवे (लक्ष्मीवाडी) प्रथम क्रमांकाचा मानकारी ठरले.राष्ट्रीय काँग्रेस कुडाळ यांच्या वतीने बैलगाडी, सुदृढ बैल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील १० बैलगाडी स्पर्धेत आणि १० ते १५ सुदृढ बैल सहभागी झाले होते.
तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने बैलगाडी सजावट स्पर्धा व सुदृढ बैल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन जिजामाता चौक येथे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्यानंतर बैलगाडी आणि बैलांची मिरवणूक काढण्यात आली. जिजामाता चौक येथून ही मिरवणूक गांधी चौक मार्गे- मारुती मंदिर- वर्दम तिठा- बाबाचांद दर्गा - पानबाजार ते गुलमोहर हॉटेल अशी काढण्यात आली. गुलमोहर हॉटेलकडे या स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले.
यावेळी प्रांतिक सदस्य प्रकाश जैतापकर, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, नगराध्यक्षा अक्षता खटावकर, माजी नगराध्यक्षा आफरीन करोल, ठाकरे गट युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, माजी जि. प. सदस्य अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, अतुल बंगे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तबरेज शेख, शहराध्यक्ष तौसिफ शेख, सुंदरवल्ली स्वामी, शहराध्यक्ष शुभांगी काळसेकर, सोनल सावंत, श्रावणी शिरसाट, वैभव आजगावकर, रोहन काणेकर, अनंत खटावकर, शेतकरी संघटनेचे अवी शिरसाट, अप्पू राणे, बंड्या मांजरेकर, शाहिद शेख व बैल मालक उपस्थित होते.
स्पर्धेचा उर्वरित निकाल :
प्रथम क्रमांक सतीश आळवे (लक्ष्मीवाडी)द्वितीय क्रमांक संजय सावंत (तुपटवाडी) व तृतीय श्री. साईल (पंणदूर) यांनी मिळविला. सर्व सहभागी स्पर्धकांना मानधन देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण महेश परब यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तालुक्यातील शेतकरी संघटना व तब्रेज शेख तोसिफ शेख यांनी मेहनत घेतली.