
कणकवली : कणकवली शहरात डीपी रोडनजीक असलेल्या गटाराच्या चेंबरमध्ये बैल कोसळल्याची घटना मंगळवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती समजताच कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह मन्या सावंत, मिथून ठाणेकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. ठेकेदार अनिल पवार आपल्या सहकारी कामगारांसोबत घटनास्थळी दाखल झाले.
अखेर जेसीबी व बेल्टच्या सहाय्याने बैलाला चेंबरमधून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने बैल चेंबरमध्ये पडल्याची बाब येथील नागरिक मधू सकट यांच्या वेळीच लक्षात आली. परिणामी बैल मृत्यूपासून बचावला. तर बैलाला विशेष दुखापतही झालेली नाही.