
देवगड : महाविद्यालय विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती वाढावी या उद्देशाने महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी यांच्या संकल्पनेतून आज एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. आज आपल्या देशाचे अंतरिम बजेट केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेमध्ये मांडले यावेळी या बजेटचे थेट प्रक्षेपण महाविद्यालयाच्या डिजिटल वर्गांमधून दाखवण्यात आले. सर्व विद्यार्थी बजेटचे थेट प्रक्षेपण सुरू असताना महत्त्वाचे मुद्दे टिपून घेताना दिसत होते.
या महाविद्यालयात येणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी या क्षेत्राबाबत बजेटमध्ये सांगितलेल्या तरतुदीन बाबत समाधान व्यक्त केले. नवीन रोजगार निर्मिती बाबत केलेल्या तरतुदीन बाबत विद्यार्थी समाधानी वाटत होते यावेळी प्रा.मयुरी कुंभार, प्रा. सिध्दी कदम, प्रा. सुगंधा पवार, प्रा.कोमल पाटिल, प्रा. ताम्हणेकर, प्रा. सावंत हे उपस्थित होते.