
सिंधुदुर्गनगरी : बिहार बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमवारी २८ एप्रिलला सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धीस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्गातील बौद्ध समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा सुरू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात झाली आहे.