
दोडामार्ग : विश्वशांती दूत गौतम बुद्ध यांची जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, दोडामार्गच्यावतीने मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. तालुक्यातील बौध्द बांधव आणि भीमा अनुयायी यामी मोठया संख्येने उपस्थित राहून गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
तथागत महाकारुनी गौतम बुद्ध यांची २५७० व्या जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, दोडामार्गच्यावतीने दोडामार्ग येथील स्नेह रेसिडेन्सी हॉटेल याठीकाणी करण्यात आला होता. श्रामणेर श्रीधर बाबूराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौतम बुद्ध, अशोक सम्राट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेना पुष्प हार अर्पण, मेणबत्ती प्रज्वलीत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती दोडामार्ग अध्यक्ष अंकुश विष्णु जाधव, कार्याध्यक्ष विजय लाडू जाधव, उपाध्यक्ष भिवा कृष्णा आयनोडकर,सदाशिव भिकाजी आयनोडकर, प्रकाश लक्ष्मण कांबळे, भगवान महादेव जाधव, मधुकर धर्माजी कदम, कृष्णा बाबी कदम, सचिव दीपक बुधाजी जाधव, सहसचिव सखाराम गुणाजी कदम,खजिनदार संतोष केशव जाधव, सहखजिनदार सीताराम तानु जाधव, सल्लागार रमाकांत कृष्णा जाधव, गणपत लाडू कांबळे,सदस्य शंकर मधुकर जाधव, हरिश्चंद्र रामा मणेरकर, रामदास राघोबा कांबळे,सुजित प्रकाश कांबळे, सौ. राजश्री भिवा आयनोडकर, शंकर लक्ष्मण जाधव, विजय आप्पा जाधव, रामा अर्जुन जाधव, आनंद सम्राट, बाळकृष्ण कदम सह आदी उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील शैक्षणिक स्थितीवर चर्चा सत्र घेण्यात आले असता उपस्थित मान्यवर व्यक्तींनी आपापली मत यावेळी मांडळी काहीनी सूचना केल्या, तालुक्यात मागासवर्गीय समाजाची मुलं शिकलेली असून त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना अनेक अडचणी येतात, नोकऱ्या मिळत नसल्याने काही मुले व त्यांचे पालक यांचा शिक्षणाकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलेला आहे, दहावी बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून गोव्यात खाजगी कंपन्या मध्ये तूटपुंज्य पगारावर काम करतात. शिक्षणाच्या अनेक सुविधा उपलब्ध असताना मुले शिक्षण घेत नाहीत या बाबत अशी काहीनी खंत व्यक्त केली. शिक्षणाशिवाय आपल्या समाजाची प्रगती होणार नाही. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या ब्रीद वाक्या प्रमाणे आपल्या समाजाने आज शिक्षण घेतलं पाहिजे. संघटित व्हायला पाहिजे आणि वेळ पडली तर संघर्ष ही करावा लागला तर तो संघर्ष केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचाराने आपण सर्वांनी चाललं पाहिजे त्यांचे विचार आपण अंगीकृत करून समाज परिवर्तन आपण सर्वांनी मिळून करूया असे भावनिक आवाहन यावेळी या चर्चा सत्राच्या माध्यमातून उपस्थित मान्यवारांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर जाधव यांच्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार भिवा आयनोडकर यांनी मानले.










