
सावंतवाडी : कुणकेरी गावात लावण्यात आलेला बीएसएनएल टॉवर वारंवार बंद पडत असून त्यावर योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने बीएसएन एलचे अधिकारी तथा जिल्हा प्रबंधक आर. व्ही. जन्नू यांच्याकडे करण्यात आली.
संबंधित टॉवरसाठी असलेली बॅटरी खराब झाल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर ही समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे याबाबत योग्य ती भूमिका घेण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी मंगेश सावंत, अभिजीत सावंत, विश्राम सावंत, नरेश परब, मनोज घाटकर, एकनाथ सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.