टॉवर आहे मात्र नेटवर्क असं चालणार नाही

BSNL अधिकाऱ्यांच्या कामाबाबत नितेश राणेंकडून तीव्र नाराजी
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 21, 2025 18:54 PM
views 142  views

सिंधुनगरी :  बीएसएनएल टॉवर होतात पण त्या टॉवर वरून ग्राहकांना नेटवर्क मिळते की नाही हे गांभीर्याने पाहावे. जिथे टॉवर आहेत त्यांना रेंज येत नसेल तर त्याबाबत तातडीने उपाययोजना करा. खासदार नारायण राणे यांनी केलेल्या सूचनांची तातडीनं पुरता करा! अन्यता अधिकाऱ्यांना रेंज नसलेल्या ठिकाणी पाठवू अशी तंबी मंत्री नितेश राणे यांनी दिली. 

बीएसएनएल रेंज बाबत जिल्ह्यात अनेक तक्रारी आहेत. टॉवर उभे केलेत मात्र रेंज नाही अशी उदाहरणे मंत्री नितेश राणे यांनी देत अधिकाऱ्यांच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नेटवर्क मिळत नाही अशा तक्रारी यापुढे नको असे आदेश त्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, मनीष दळवी, बी एस एन एल चे जिल्हा प्रबंधक रविकिरण जाणू, सागर जोहरले, अतुल पाठने, श्रीमती मुबिन मुल्ला, विलास गोवेकर,कमलेश, सुधाकर हिरामणी, समृद्धी कामत आदी बी एस एन एल अधिकारी उपस्थित होते.