
देवगड : तालुक्यातील आशा स्वयंसेविकांना आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या भाऊबीज भेट वाटप देवगड तालुका महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आले. आशा स्वयंसेविकांचा संप चालू असल्याने ऐन दिवाळीत त्यांना ही भेट वाटप झाली नव्हती.
या कार्यक्रमाला माजी आमदार अजित गोगटे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बोडस जिल्हा कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष प्रियांका साळस्कर जिल्हा सदस्य मनस्वी घारे, तालुकाध्यक्ष उषःकला केळुसकर संजना आळवे, नगरसेविका प्रणाली माने, तन्वी चांदोसकर भाजपा पदाधिकारी तन्वी शिंदे प्राजक्ता घाडी , श्वेता शिवलकर, इत्यादी उपस्थित होत्या.
यावेळी माजी आमदार अजित गोगटे यांनी आशा स्वयंसेविकांच्या करोना काळातील कामाबद्दल गौरवोद्गार काढले व पंतप्रधान योजनेतील विविध योजनांची माहिती देण्यात आली. पीएम विश्वकर्मा योजना कशी राबवायची याबाबतही सविस्तर सांगण्यात आले.
यावेळी प्रकाश बोडस यांनी मार्गदर्शन केले जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रियांका साळस्कर यांनीही मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. केळुसकर तर आभार तन्वी चांदोस्कर यांनी मानले.