
देवगड : देवगड तालुक्यातील जामसंडे येथे भाऊ व वडिलांना मारहाण करण्याची घटना घडली असून येथील संशयित निशिकांत याने आपला सख्ख्या मोठा भाऊ निखिल (३७) याच्याशी वाद केला. त्याला शिवीगाळ करून घराच्या हॉलमध्ये ठेवलेल्या लाकडी मुठीच्या हातोडीने निखिलच्या डोक्यावर मारहाण केली. तसेच तिथे आलेल्या वडील सुबोध परब यांच्या डोक्यावर, गालावरही संशयित निशिकांत याने हातोडीने मारून दुखापत केली. हा प्रकार १८ डिसेंबर रोजी रात्री ९ वा. च्या सुमारास घडला.
वडिलोपार्जित जमीन भाड्याने देण्याच्या व त्यातून मिळणाऱ्या मोबदल्याच्या कारणावरून सख्ख्या भावासह वडिलांना हातोड्याने मारहाण करून त्यांना दुखापत केल्याप्रकरणी जामसंडे बाजारपेठ येथील निशिकांत सुबोध परब (वय ३६) याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामसंडे बाजारपेठ येथील वडिलोपार्जित जमीन भाड्याने देण्याच्या व त्यातील मिळणाऱ्या मोबादल्याच्या कारणावरून संशयित निशिकांत याने आपला सख्ख्या मोठा भाऊ निखिल (३७) याच्याशी वाद केला. त्याला शिवीगाळ करून घराच्या हॉलमध्ये ठेवलेल्या लाकडी मुठीच्या हातोडीने निखिलच्या डोक्यावर मारहाण केली. तसेच तेथे आलेल्या वडील सुबोध परब यांच्या डोक्यावर व गालावरही संशयित निशिकांत याने हातोडीने मारून दुखापत केली.
याप्रकरणी निखिल परब याने देवगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून देवगड पोलिसांनी संशयित निशिकांत परब याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता ११८ (१) (२), ११५ (२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार उदय शिरगावकर या घटनेचा पुढील तपास करत आहेत.