
सावंतवाडी : तालुक्यातील झाराप पत्रादेवी महामार्गालगत वेत्ये खांबलवाडी येथे बंद घर फोडले आहे. अज्ञात चोरट्याने घरच्या कपाटातील दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली असून सीताराम पाटकर कुटुंबीय हे गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आपले घर बंद करून काही अंतरावर असलेल्या एका मंदिरात धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. दुपारी दीड वाजता पाटकर कुटुंबीय घरी आले असता घराची कौले उघडलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यानंतर घरातील कपाटातील सामान विस्कटवून टाकलेल्या अवस्थेत दिसले. कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम चोरटयांनी लंपास केल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती पोलीस पाटील रमेश जाधव यांनी सावंतवाडी पोल ठाण्यात दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.