
वेंगुर्ला : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वेंगुर्ला तालुका बुथ अध्यक्ष यांची बैठक कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोमाने तयारीला लागा, संघटना मजबूत करा, पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोचवा असे आवाहन सौ. घारे यांनी उपस्थितांना केले. यावेळी तालुक्यातील विविध भागातून पक्षप्रवेश करण्यात आला.
आगामी विधानसभा निवडणुकीसह होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या नियोजनाबद्दलच या बैठकीत मार्गदर्शन सौ. घारे यांनी उपस्थितांना केले. याप्रसंगी तालुक्यातील अनिल चुडजी, विलास चुडजी, संजय चुडजी, दिनेश चुडजी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. अर्चना घारे-परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा नम्रता कुबल, तालुकाध्यक्ष योगेश कुबल, शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, महिला अध्यक्षा दिपीका राणे, युवक अध्यक्ष शुभम नाईक, युवती अध्यक्षा अदिती चुडजी, सलिल नाबर, सुहास कोळसुलकर, अवधूत मराठे, स्वप्निल राऊळ, बबन पडवळ, ऋतिक परब आदींसह बुथ अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.