लाच प्रकरण ; उर्मिला यादव निलंबित

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: February 12, 2025 18:20 PM
views 1502  views

सिंधुदुर्गनगरी : लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेल्या सहकारी संख्या जिल्हा उपनिबंधक कार्यालय अधीक्षक उर्मिला यादव याना निलंबित करण्यात आले आहे. तर जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे यांच्या पदाचा कार्यभार रत्नागिरी जिल्हा सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे.

श्री स्वामी समर्थ गृहनिर्माण संस्था मर्यादित, रेवतळे मालवण या गृहनिर्माण संस्थेच्या मानीव अभिहस्तांतरण आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करून जमीन संस्थेच्या नावे करण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी गृहनिर्माण संस्थेकडे करण्यात आली होती. या प्रकरणी संस्थेचे सचिव परव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिधुदुर्ग यांच्याकडे तक्रार केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात माणिक सांगळे उर्मिला यादव यांनी लाचेची मागणी केली तर लाच मागण्यासाठी माणिक सांगळे यांनी त्यांना प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले होते दरम्यान, तडजोडीअंती ३३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना माणिक सांगळे आणि उर्मिला यादव याना सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकान्यांनी रंगेहाथ पकडले होते. मंगळवार ४ फेब्रुवारीला ही कारवाई झाली होती. या कारवाईनंतर जिल्हा विशेष न्यायालयाने दोन्ही संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती ५ ते ११ फेब्रुवारीपर्यंत ते न्यायालयीन कोठडीत होते ११ रोजी त्याची सशर्त जामिनावर मुक्तताकरण्यात आली

दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी फौजदारी गुन्ह्यात ४८ तासापेक्षा जास्त कालावधीसाठी पोलीस कोठडीत अथवा न्यायालयीन कोठडीत राहिल्यास महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपित नियम १९७९ नुसार त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची तरतूद आहे. याच अनुषंगाने कोकण विभागाचे सहकारी संस्था सहनिबंधक यानी उर्मिला यादव पाच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे माणिक सांगळे यांचा पदभार काढला.

लाचप्रकरणी सहकारी संस्था सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधक माणिक सांगडे यांच्यावर कारवाई झाल्याची दखल घेत सहकार आयुक्त पुणे पानी त्यांचा पदभार काढून घेतला आहे तसंच पा पदावर सहकारी संस्था रत्नागिरी जिला उपनिबंधक सोपान शिंदे यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधकपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे