
कुडाळ : कुडाळ सोनवडेपार येथील नदीपात्रात वाळू उत्खनन करणारा पाच होड्या काल संध्याकाळी उशिरा जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र ह्या होड्या पकडल्या असल्या तरी त्यांच्यावर कारवाईबाबत कोणतीही माहीती देण्यास मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्याने देण्यास नकार दिला आहे. यामुळेच ह्या होड्या जप्त करून प्रकरण मिटवण्याचा प्रकार सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मेरिटाइम बोर्डाने सोनवडेपार नदीपात्रात बेकायदेशीर उत्खनन करणारा पाच बोटीवर कारवाई करत ह्या बोटी ताब्यात घेतल्या. यानंतर "कोकणसाद लाईव्ह" ला ह्या घटनेची माहिती मिळताच त्याचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केला असता मेरिटाइम बोर्डाच्या अधिकारी वर्गाने कारवाईबाबत माहिती देण्यास नकार दिला. जर संध्याकाळी बोटीवर कारवाई करण्यासाठी त्या ताब्यात घेतल्या होत्या तर रात्री उशिरापर्यंत माहिती देण्यास का नकार दिला जात होता? हा प्रश्न उपस्थित होत होता. त्यामुळे ही कारवाई केवळ फार्स होता की खरच कारवाई होती? हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.