'शौर्या तुला वंदितो' उत्साहात

Edited by:
Published on: December 24, 2023 18:28 PM
views 51  views

देवगड : सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान ही संस्था गेली 16 वर्षे अखंडपणे गडकिल्ले जतन व संर्वधन चे कार्य करत आहे. गडकिल्ले जतन व संर्वधन कार्य करत असताना अनेक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविले जातात. याचाच एक भाग म्हणजे भारत देशाच्या संरक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करून देशसेवेतून निवृत्त माजी सैनिक, स्वातंत्र्य सेनानी यांच्या शौर्य आणि साहसाप्रती कृतज्ञता - ऋण व्यक्त करणे यासाठी दर वर्षी संस्थेच्या विविध विभागामार्फत माजी सैनिकांच्या करिता *शौर्या तुला वंदितो* आणि गुणवंत विद्यार्थी करीत गुणगौरव कार्यक्रम आयोजित करत असतात.

यावर्षीचा शौर्या तुला वंदितो व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम देवगड येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कुल, जामसंडे या शाळेच्या सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात बिडवाडी - कणकवली येथील माजी सैनिक श्री कावले साहेब यांच्या लहान मुलांच्या टीम कडून शाळेच्या पटांगणात मल्लखांब व लाठी काठी चे प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. त्यानंतर सर्व माझी सैनिक यांना श्री. स. ह. केळकर महाविद्यालय देवगडच्या NCC युनिट च्या विद्यार्थिनी कडून संचलन करून मानवंदना देण्यात आली. आणि दुर्गसेविका यांनी ओवाळणी करून माजी सैनिक व पाहुणे यांचे स्वागत करण्यात आले. पुढे अमर जवान यांना संस्थेचे संस्थापक श्री श्रमिक गोजमगुंडे सर यांच्या हस्ते अमरपुष्प चक्र अर्पण करण्यात आले.

माजी सैनिक, मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून गणेशपूजन करून छत्रपती श्री शिवाजी महाराज, सरस्वती माता आणि भारत मातेला पुष्पहार घालण्यात आला. आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून बालकलाकार यांनी गणेश वंदना व देशभक्ती गीत सादर केले. त्यानंतर देवगड तालूका व पंचक्रोशीतील 10 माजी सैनिक व स्वातंत्र्य सेनानी यांना शाल, श्रीफळ,गुलाबपुष्प व सहयाद्री शौर्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच समाजात उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक आणि कोरोना काळात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या कोरोना योद्धांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थी यांना सह्याद्री गुणगौरव सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या सर्व दुर्गसेवक - दुर्गसेविका यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गसेवक सिद्धेश परब दादा यांनी केले तर आभार दुर्गसेवक दिपक करंजे दादा यांनी मानले.