ब्रेक फेल, सहलीच्या एसटीची पाईपलाईनला धडक

विद्यार्थी किरकोळ जखमी
Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 28, 2024 13:17 PM
views 569  views

देवगड : देवगड खाकशी येथील तीव्र वळणावर शैक्षणिक सहलीला मोठा अपघात झाला.  चार विद्यार्थी किरकोळ जखमी होऊन एसटीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात पृथ्वीराज अमोल धाबेकर, गणेश सिद्धेस्वर भडके, श्रीकृष्ण शीवाजी करंजकर, संकेत सुखदेव सुकांडे, प्रतिक दत्तात्रय शिंदे यांचा समावेश आहे. दरम्यान पुढील प्रवासाकरीता देवगड आगाराने पर्यायी गाडी व चालक उपलब्ध करून दिला. तसेच या दुर्घटनेत देवगड जामसंडेला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्यामुळे देवगड जामसंडे शहराचा पाणीपुरवठा देखील यामुळे ठप्प झाला आहे.

देवगडहुन कुणकेश्वरकडे जाणारी धाराशीव तालुकयातील तवळडे येथील जयहिंद विद्यालयाची शैक्षणिक सहलीच्या गाडीला ख़ाकशी घाट परिसरातील तीव्र वळणावर गाडीचे ब्रेक निकामी झाले. अपघात होऊन चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.  त्याचबरोबर एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे. चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. चालकाने प्रसंगावधान राखून बस नजीकच्या देवगड प्रादेशिक नळपाणी योजनेच्या पाईप लाईनला धडकली व भेंडले माडावर जाऊन नजीकच्या झाळीत अडकली. गाडीत सुमारे ४० विद्यार्थी होते. सुदैवाने गाडीतील चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. या अपघातात एसटी गाडीचे आणि तेथील देवगड नळपाणी पाईप लाईन फुटल्याने देवगड जामसंडे पाणी पुरवठा खंडित झाला. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक ग्रामस्थ विनोद पेडणेकर उदय परब, महेश कोयघाडी, दर्शन नवलू, समीर लाड यांनी धाव घेतली.  अन्य वाहनांना सूचना करून सहकार्य केले. अपघातात किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थ्याना देवगड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील प्रवासास निघाले. घटनास्थळी देवगड आगार व्यवस्थापक विजय घोलप, स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर, हेड मकेनिक ब्रम्हदेव चव्हाण, पोलीस हवालदार आशिष कदम यांनी धाव घेतली.  

धाराशिव विद्यालयाची शैक्षणिक सहल लांजा येथून देवगडकडे आली. त्यानंतर कुणकेश्वर मार्गे मालवणकडे जात असताना जामसंडे ख़ाकशी या मार्गावर कुणकेश्वर कडे जात असताना ख़ाकशी घाटी मध्ये एसटीचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाचे लक्षात येताच त्यांनी ओरडून याची माहिती दिली. विद्यार्थी - शिक्षक यांना सावध केले. गाडी नजीकच्या देवगड नळपाणी योजनेच्या पाईपलाईनला धडकून झाळीत अडकली.  सुदैवाने मोठा अनर्थ टळला.