ब्रेक फेल | टेम्पो गेला मातीच्या ढिगार्‍ यात

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 06, 2023 18:35 PM
views 645  views

देवगड :  ब्रेक फेल झाल्यामुळे टेम्पो रस्त्याच्या बाजूला असलेल्या ढिगार्‍यावर घुसून अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या तीव्र वळणावर मच्छी विक्री करणाऱ्या महिलांमुळे येणार्‍या जाणार्‍या नागरिकांची अरुंद रस्त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. व अपघाताच्या ह्या घटना घडत आहेत. गुरुवारी दुपारी ही घटना घडली त्यामुळे मोठा धोका टळला नागरिकांचा जीव गेल्यावर नगरपंचायत प्रशासनाला जाग येणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

देवगड एसटी स्टँड कडून खाली गेल्यावर तीव्र वळणावर मोठ्या प्रमाणात सकाळी व सायंकाळी मच्छी विक्री करण्यासाठी महिला बसत असतात परंतु दुपारची वेळ असल्यामुळे देवगड खालची बाजारपेठ येथे जाणाऱ्या टेम्पोचे अचानक ब्रेक फेल झाले. सुदैवाने दुपारची वेळ होती त्यामुळे या मार्गावर अन्य वाहने अथवा नागरिकांची रहदारी नव्हती तरीदेखील टेम्पो चालका च्या लक्षात आले आपल्या टेम्पोचे ब्रेक फेल झाले आहेत.त्यांनी तात्काळ डाव्या बाजूला रस्त्यातलगत असलेल्या मातीच्या ढिगार्‍यावर आपला टेम्पो वळवला आणि वाहनावर ताबा मिळवला.दरम्यान ब्रेक फेल टेम्पो विदेशी मद्य माल घेऊन देवगड भागात आला होता.काही कालावधीत तात्काळ त्या टेम्पोचे काम करून तेथुन हलविण्यात आला. नगरपंचायत प्रशासनाकडे स्थानिक नागरिकांसह व्यापाऱ्यांनी देखील वेळोवेळी मागणी केली आहे.

अशा प्रकारे देवगड कॉलेज नाका येथे देखील रस्त्याच्यालगत मच्छीमार महिला बसत असल्यामुळे वाहनांना अडथळा ठरत असून अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. भविष्यात मोठा अपघात झाला तर याची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.दुपारची वेळ होती म्हणून या रस्त्यावर रहदारी व मच्छी विक्रेत्या महिला बसल्या नहत्या जर सकाळच्या वेळीच ही घटना घडली असती तर काय झाले असते याचा नगरपंचायत प्रशासन गांभीर्याने विचार करणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस प्रशासन याकडे का गांभीर्याने पाहत नाही… रस्त्याच्या बाजूला बेकायदेशीररित्या बसून मच्छी विक्री करत असल्यामुळे येणाऱ्या नागरिकांसह वाहतुकीला देखील अडथळा ठरत आहे.परंतु स्थानिक पोलीस प्रशासन याकडे का गांभीर्याने पाहत नाही एखादा अपघात घडल्यावर पोलीस प्रशासनाला जाग येणार का ? असा सवाल वाहन चालकांमधून देखील उपस्थित केला जात आहे.