मराठी ग्रंथालय आजगावच्यावतीने 'ग्रंथ प्रदर्शन'..!

Edited by: विनायक गावस
Published on: November 07, 2023 16:16 PM
views 216  views

सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव येथे मराठी ग्रंथालय आजगावच्यावतीने नुकतेच 'ग्रंथ प्रदर्शन' भरविण्यात आले. यावेळी मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ अण्णा झांट्ये, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विलासानंद मठकर, मीरा आपटे, श्रीमती सरोज रेडकर, गवंडी, ग्रंथालयाचे ग्रंथपाल, सहाय्यक व इतर मान्यवर उपस्थित होते.

समाजात अलीकडच्या काळात सोशल मीडियामुळे युवा पिढी वाचनापासून लांब जात असून ग्रंथालयाची कास धरल्यास विविध क्षेत्रात अभिव्यक्त होऊन आपल्याला यश मिळविण्याचा मूलमंत्र ग्रंथांद्वारा दिला जातो. असे मत ग्रंथालयाचे अध्यक्ष रामचंद्र झांट्ये यांनी व्यक्त केले. आगामी काळात ग्रंथालयातर्फे समाजोपयोगी उपक्रम राबविले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.