हळबे महाविद्यालयात ग्रंथप्रदर्श...!

Edited by:
Published on: January 06, 2025 19:36 PM
views 113  views

दोडामार्ग : आजच्या आधुनिक तंत्रनज्ञानाच्या युगात वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १ ते १५ जानेवारी २०२५ च्या दरम्यान वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. या उपक्रमांतर्गत हळबे महाविद्यालयात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


विद्यार्थ्यामंध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून महाविद्यालयाच्या ग्रंथालयातर्फे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनामध्ये विविध साहित्यिकांचे, थोर पुरुषांचे, चरित्र, आत्मचरित्र, ऐतिहासिक कादंबरी, स्पर्धा परीक्षा, सामाजिक शास्त्र, लोकप्रिय मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य, प्रेरणादायी लेखन आदींचा समावेश करण्यात आला होता. या ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य तथा दोडामार्ग येथील प्रसिद्ध उद्योजक विवेकानंदजी नाईक,  दैनिक कोंकणसादचे  संपादक संदिप देसाई यांच्या हस्ते करण्यात आले


या उदघाटन प्रसंगी मान्यवरांनी महाविद्यालयातील ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या ग्रंथ संपदेबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी वेगवेगळ्या पुस्तकाबद्दल माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी वाचन करून आपले पुढील जीवन सुखकर करावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी केले. ग्रंथप्रदर्शन यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल श्री रामकिसन मोरे व श्री कल्पेश यांनी मेहनत घेतली. यावेळी तरुण भारत चे पत्रकार श्री तेजस देसाई, समीर ठाकूर, जिल्हा पत्रकार संघाचे श्री सुहास देसाईदैनिक लोकमतचे श्री वैभव साळकर, दैनिक पुढारीचे श्री रत्नदीप गवस, श्री लवू  परब, गणपत डांगीलखू खरवत, महेश लोंढे, संदेश देसाई, प्रशांत गवस आदि उपस्थित होते. तसेच यावेळी प्रा. डॉ. पी. डी. गाथाडेप्रा. डी . वाय. बर्वे, प्रा. पी. एन. ढेपे, प्रा. डॉ. एस. यु. दरेकर, प्रा. डॉ. एस. एन जाधव प्रा. डॉ. आर. एस. इंगळे, प्रा. डॉ. एस. एन. खडपकर, प्रा. कु. भाग्यश्री गवस, प्रा. रोहन बागकर, प्रा. पद्माकर शेटकर, प्रा. कु. दर्शनी कोटकर, प्रा. कु. शेफाली गवस, श्री योगेश ठाकूर, सर्व विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.