मुंडे महाविद्यालयात ‘ग्रंथ प्रदर्शन’

Edited by: मनोज पवार
Published on: April 16, 2025 11:30 AM
views 101  views

मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे  कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकतीच  सांस्कृतिक विभाग, ग्रंथालय विभाग, मराठी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने  महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी  जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दगडू जगताप होते.  यावेळी सांस्कृतिक विभागाचे डॉ. महेश कुलकर्णी, डॉ.  भरतकुमार सोलापुरे, डॉ.  संदीप निर्वाण, डॉ. सूरज बुलाखे, डॉ. संगीता घाडगे, डॉ. विनोदकुमार चव्हाण, डॉ.  शैलेश  भैसारे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी सैनिक मा. श्री. शामराव पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक विभागाचे डॉ. महेश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे औचित्य साधून ग्रंथालय विभागामार्फत आयोजित डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा व त्यांच्या विचारांवर आधारित ‘पुस्तक प्रदर्शनां’चे आयोजन करण्यात आले होते. सदर ‘पुस्तक प्रदर्शना’चे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, अस्पृश्य  व दीन-दलितांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य महान व अव्दितीय असेच म्हणावे लागेल. त्यांनी घालून दिलेला आदर्श  आपणा सर्वांना मार्गदर्शक व प्रेरणादायी असून त्यांनी मांडलेले विचार आज आचरणात आणणे आवश्यक  आहे. तत्पूर्वी ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप यांनी सदर ‘ग्रंथ प्रदर्शन’  भरविण्यामागील उद्देश स्पष्ट करुन उपस्थितांचे स्वागत केले. 

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विद्या-व्यासंग विद्याथ्र्यांना प्रेरणादायी व्हावा या उद्देशाने ‘वाचन अभियान’ राबविण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व संविदानावर  आधारित प्रश्नमंजूषा घेण्यात आली.  यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला. 

कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ.  अशोक साळुंखे यांनी मानले.